Home max political पवाराचं राजकारण संपल, मी तसं बोललोच नव्हतो – देवेंद्र फडणवीस

पवाराचं राजकारण संपल, मी तसं बोललोच नव्हतो – देवेंद्र फडणवीस

शरद पवार, Sharad Pawar, ncp, news, maharashtra, politics, marathi, maxmaharashtra
Courtesy: Social media
विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान इंडिया टुडे ला दिलेल्या मुलाखतीत ‘पवारांच्या राजकारणाचं युग आता संपलं आहे’ असं वक्तव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. या संदर्भात त्यांना एबीपी माझाच्या मुलाखतीत शरद पवारांचं राजकारण संपलं आहे. असं तुम्ही म्हटला होता. त्याचा फटका तुम्हाला बसला का? यावर देवेंद्र फडणवीस यांनी
‘मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, पवारांचं राजकारण संपलं असं मी कधीच म्हटलं नाही. मी त्याचं मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या वेळेस मला विचारलं. त्यावेळेस मी असं म्हटलं पवार ज्या प्रकारचं राजकारण अनेक वर्ष चालावायचे. त्या प्रकारचं राजकारण आता चालणार नाही. पिढी बदलली आहे. बदललेल्या पिढीला तसं राजकारण चालणार नाही. मला त्याच मुलाखतीत विचारलं. मी त्याच मुलाखतीत सांगितलं. कोणाचं राजकारण कोणीच संपवू शकत नाही.’
नक्की काय म्हटलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी…
‘इंडिया टुडे’च्या कार्यक्रमात ‘तुम्ही 21 व्या शतकाचे शरद पवार ठराल का?’ असा प्रश्न पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी फडणवीस यांना विचारला होता. त्यावर ‘मी शरद पवार का होऊ? मी तर देवेंद्र फडणवीसच होईन. माझं स्वतःचं राजकारण आहे, त्यांच्या राजकीय कूटनीतीची मला गरज नाही. पवारांच्या राजकारणाचं युग आता संपलं आहे, पिढी बदलली आहे. पवारांनी केलेलं राजकारण आता जनता स्वीकारत नाही.’ असं म्हणत शरद पवारांच्या राजकारणाचा युगाचा अस्त झाला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997