शिवराज्याभिषेक सोहळ्याकडे पाठ फिरवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना नेटिझन्सनी झोडपले

शिवराज्याभिषेक सोहळ्याकडे पाठ फिरवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना नेटिझन्सनी झोडपले

भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ वा राज्‍याभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री गैरहजर होते. राज्‍यभरासह देशभरातून हजारोंच्या संख्येने या सोहळ्यासाठी शिवभक्‍त किल्ले रायगडावर दाखल झाले. मात्र अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने नेटिझन्सने मुख्यमंत्र्यांना #ShameOnCm म्हणत ट्रोल केलं आहे.

संतोष पवार नामक एका व्यक्तीने म्हटलं आहे की, “आज शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर सुरु असताना राज्याचे #मुख्यमंत्री रायगडावर जायचं सोडून माधुरी दीक्षितच्या घरी आहेत अमीत शहा सोबत…. छत्रपती शिवाजी महाराज फक्त निवडणूकांपुरतेच का ? #ShameOnCm” असं म्हणत मुख्यमंत्र्यांना “छत्रपती शिवाजी महाराज फक्त निवडणूकांपुरतेच का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

सिद्धू आणि संतोष पवार यांनी देखील हाच सवाल उपस्थित केला आहे.