सत्ता नाही घटनाच मोठी! पत्रकार प्रशांत कनोजियाची सुटका, सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला...

सत्ता नाही घटनाच मोठी! पत्रकार प्रशांत कनोजियाची सुटका, सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला झापले

पत्रकार प्रशांत कनौजिया यांच्या अटकेप्रकरणी सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला दणका दिला आहे. प्रशांत कनौजिया यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ट्वीट केलं म्हणून अटक करणं योग्य नाही. असं म्हणत योगी सरकारची कानउघाडणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पत्रकार प्रशांत कनौजिया अटक प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांची देखील चांगलीच कानउघाडणी केली आहे. प्रशांत कनौजिया च्या ट्वीट बद्दल आम्ही बोलत नाही. पण ट्वीट लिहिलं म्हणून जेल मध्ये टाकणं ही घटनेची पायमल्ली आहे आणि याबाबत कोर्ट स्वस्थ बसू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. प्रशांत कनौजिया याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
घटनेची पायमल्ली होणाऱ्या या प्रकरणासंदर्भात मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांचे विश्लेषण