Home पर्सनॅलिटी सावित्री उत्सव : स्त्रियांचीं शिक्षणामुळेच प्रगती-अर्चना ताजणे

सावित्री उत्सव : स्त्रियांचीं शिक्षणामुळेच प्रगती-अर्चना ताजणे

Support MaxMaharashtra

ज्यावेळी स्त्रियांना रांधा वाढा उस्टी काढा एवढ्याच मर्यादेत रहावं लागत होतं त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दार उघडी करून त्यांच्या प्रगतीला चालना दिली यामुळे आज अनेक स्त्रिया विवीध क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. अशा शिक्षणाच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस मॅक्स महाराष्ट्र ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करत आहे. या मोहिमेत सावित्रीबाईंच्याच समाज कार्यातुन प्रेरणा घेतलेल्या सामाजीक कार्यकर्त्या अर्चना ताजणे या देखील सहभागी झाल्या आहेत व त्यांनी इतरांना देखील या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केल आहे.

सावित्री उत्सव
३ जानेवारी २०१९
३ जानेवारी हा सावित्री माई चा जन्म दिवस….शेणा दगडांचा मारं खात ती उभी राहिली म्हणूनच मी आज शिक्षण घेऊ शकले. व्यवसायात स्वतःच्या पायावर उभी राहू शकली. त्यामुळे सावित्रीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे असे मला वाटते.
या दिवशी मी दारात रांगोळी,घरावर कंदील,दरवाज्याला फुलांचे तोरण आणि उंबरठ्यावर विवेकाची पणती लावणार आहे. आणि दिवसभर सावित्री जशी कपाळावर आडवी चिरी ( कुंकू ) लावायची तशी मी लावून माझ्या ऑफिस मध्ये जाणार आहे. तुम्ही ही हा दिवस सणा सारखा साजरा करा
अर्चना ताजणे
सामाजिक कार्यकर्त्या

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997