Home News Update संजय राऊतांनी ‘ते’ वक्तव्य घेतलं मागे

संजय राऊतांनी ‘ते’ वक्तव्य घेतलं मागे

Support MaxMaharashtra

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (indira gandhi) या मुंबईत त्या काळचा अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटायला यायच्या असं धक्कादायक वक्तव्य शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केलं होतं. पण या वक्तव्यावर मोठा गदारोळ झाल्यानंतर अखेर संजय राऊत यांनी आपलं ते वक्तव्य मागे घेत असल्याचं सांगितलंय. पुण्यात लोकमत दैनिकाच्या एका कार्यक्रमात लाईव्ह मुलाखती दरम्यान संजय राऊत यांनी हे धक्कादाय़क वक्तव्य केलंय. संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्यात नुकतीच अस्तित्वात आलेल्या महाविकासआघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

संजय राऊतांनी 'ते' वक्तव्य घेतलं मागे

संजय राऊतांनी 'ते' वक्तव्य घेतलं मागे#MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई गुरुवार, 16 जनवरी 2020

आपण दाऊद इब्राहिमला एकदा दमही दिला होता असा दावा करत संजय राऊत यांनी त्या काळात मुंबईचे पोलीस कमिश्नर कोण होणार हेदेखील अंडरवर्ल्ड डॉन ठरवायचे असंही सांगितलं. पण इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड करीम लाला यांना भेटायला यायच्या या त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडालीये. मात्र यावर आज संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत करीम लाला हा पठाण समाजाचा नेता असल्याने त्यासंदर्भात इंदिरा गांधी त्याला भेटायच्या हा इतिहास आहे असं सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतरही काँग्रेसचं समाधान न झाल्यानं अखेर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण वक्तव्य मागे घेतो असं म्हणत संजय राऊत यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

हे ही वाचा…

जेव्हा सुप्रिया सुळे अजित पवारांचा सत्कार करतात…

नैतिक अहंगंडातून राजकीय सत्तेकडे बघू नका !

वाडिया रुग्णालयासाठी शासनाकडून २४ कोटी रुपये

काँग्रेसचे नाराज नेते संजय निरुपम यांनी मात्र संजय राऊतांच्या या वक्तव्यावरुन ट्विट करुन जोरदार टीका केलीये. संजय राऊत यांनी महाराष्ट्राचं मनोरंजन करावं, उगीच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींबाबत अपप्रचार केला तर शिवसेनेवर पश्चातापाची वेळ येईल, असा इशाराही दिलाय.

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997