Home Election 2019 नारायण राणेंना संजय राऊत यांच्या शुभेच्छा!

नारायण राणेंना संजय राऊत यांच्या शुभेच्छा!

Support MaxMaharashtra

शिवसेनेचा (shivse) मुख्यमंत्री व्हावा, यासाठी गेल्या काही 21 दिवसांपासून माध्यमांच्या प्रश्नांना तोंड देणाऱ्या संजय राऊत (sanjay raut) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. आज संजय राऊत यांचा वाढदिवस आहे. पत्रकारांनी त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच सरकार येणार हे पुन्हा एकदा सांगितलं. पत्रकारांनी त्यांना हे तीन पक्ष कोणत्या सुत्रानुसार एकत्र येतात. असं विचारलं असता, त्यांनी फॉर्म्युल्याची चिंता नको, उद्धव ठाकरे (Uddhav thakary) ठरवतील असं उत्तर दिलं.

शिवसेना आणि राष्ट्रवादी दरम्यान अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घेण्यात येईल का? यावर राउत यांनी मुख्यमंत्र्य़ांना चांगलाच टोला लगावला. आमचा 5 वर्ष नाही तर 25 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा. अशी आमची इच्छा आहे. मात्र, आम्ही परत परत हे म्हणणार नाही… मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन

दरम्यान आघाडीची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी शरद पवारांचं पुलोद चं सरकार कसं स्थापन केलं? वाजपेयींचं पहिलं सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चाललं. असे दाखले देत शिवसेना आणि आघाडी प्रमाणे या पुर्वी देखील सरकार चालली आहेत. याची माहिती दिली. ज्यांच्या सोबत आपण सरकार तयार करत आहोत. त्यांना सरकार चालवण्याचा मोठा अनुभव आहे. असं म्हणत येणारं सरकार पुढील पाच वर्ष टिकेल. याची शाश्वती दिली.

दरम्यान भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी राणे प्रयत्न करत असल्याबाबत राऊतांना प्रश्न विचारला असता, त्यांनी राणेंना (Narayan Rane ) शुभेच्छा दिल्या.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997