रक्षाबंधन : ‘पुरग्रस्त भागात बहिण येईल, मनातलं दु:ख हलकं होईल म्हणून मी...

रक्षाबंधन : ‘पुरग्रस्त भागात बहिण येईल, मनातलं दु:ख हलकं होईल म्हणून मी हा स्टॉल लावला’

108
0

पश्चिम महाराष्ट्राती कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि या नदीच्या उपनद्यांना आलेल्या पुराचा शेकडो गावांमध्ये मोठा फटका बसला आहे. २००५ मध्ये कृष्णा नदीला आलेला पूर धडकी भरणारा होता. पण यावर्षीच्या पूराने त्याचाही विक्रम मोडीत काढला होता. १२ दिवस सांगली – कोल्हापूर पुराणे वेढलेलं होतं. कृष्णा खो-यातील सर्वच नद्यांना महापूर येऊन सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना फटका बसला होता. सांगली जवळ कृष्णा नदीची पाणी पातळी ५४ फूट दोन इंच इतकी वाढली होती. सांगलीत आतापर्यंतची सर्वात ज्यास्त पाणी पातळीची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी, २००५ ला सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी ५३ फूट नऊ इंच इतकी होती तर कृष्णेने २००५ ची पाणी पातळी ओलांडली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, याचा परिणाम छोट्या उदयोगांवर देखील पाहायला मिळाला.

रक्षाबंधनच्या दिवशी देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात चित्रं थोडं वेगळं पाहायला मिळालं. येथे पुरामुळे रक्षाबंधनच्या दिवशी राखी विकत घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे दुकानं देखील शिल्लक राहीली नव्हती. हरीपूरच्या गावात अनेक वर्ष सुनिता सुभाष वर्धमान राखीचे स्टॉल लावत असतात. मात्र, यंदा त्यांना स्टॉल लावताना अत्यंत दु:ख होत होते.

सुनिता म्हणतात… दरवर्षी स्टॉलवरुन जवानांच्या बहिणी आर्मीमध्ये असलेल्या त्यांच्या भावांना राख्या पाठवायच्या मात्र, यंदा तसं झालं नाही. कारण पुरामुळे बहिणींना जवानांना राख्या पाठवता आल्या नाहीत. यावर्षी महापुरामुळे कोणी राख्या घेण्यासाठी आलं नाही.

सुनिता प्रत्य़ेक वर्षी एक महिन्यासाठी स्टॉल लावतात. यंदा त्यांना स्टॉल लावायचं मनस्थिती नव्हती. मात्र, येथील लोकांचे पुरामुळे आलेले दुःख बाजूला सारण्यासाठी मी हा स्टॉल लावला आहे. पूरग्रस्त भागात बहिणीनं भावाच्या घरी यावं. त्याचं दु:ख जाणून घ्यावं. दोघाचं संभाषण व्हावं. यासाठी मी हा स्ट़ॉल लावला आहे. हे सांगताना सुनिता यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या.

मला पैशाचं काही वाटत नाही. तीन ते चार दिवसांमध्ये ५००-६०० राख्या विकल्या गेल्या आहेत. पूरस्थितीमुळे लोकं खूप कमी राख्या घेतायत. सगळे व्यवसाय बंद आहेत. रक्षाबंधनच्या दिवशी माणसांची माणसिकता बदलून जाण्यासाठी हा स्टॉल लावला आहे. लोक राख्या विकत घेतील, बहिण भावाशी बोलेलं, मनातील दु:ख हलकं करेल. आई वडिलांना भेटेल. म्हणून मी हा स्टॉल लावला असल्याचं सुनिता यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.