सलाम बाॕम्बेच्या तरुणाईला सलाम …

सलाम बाॕम्बेच्या तरुणाईला सलाम …

फोटोप्रदर्शनातून तरूणाईने दाखवली त्यांची कलाकृती ..
ज्या पद्धतीने खडबडीत दगडाला योग्य तो आकार देऊन मूर्तिकार मूर्ती घडवतो अगदी त्याचं पद्धतीने म.न.पा शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच त्यांच्या अंगात दडलेल्या आवडत्या कलाकृती सादर करता याव्या यासाठी सलाम बॉम्बे फाऊंडेशन च्या काही अकादमी कार्य करतात .त्यातीलच एक म्हणजे मिडीया अकादमी . अभ्यासासोबत जीवन कौशल्य विकासावर भर देत विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने आजवर मिडीया अकादमी कार्य करत आहे. मिडीया प्रशिक्षण , व्हॉइस ऑफ हल्लाबोल सारखे मंथली न्यूज लेटर यातून विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल यासाठी मिडीया अकादमी तत्पर असते.आजवर अनेक उपक्रम मुलांसाठी राबवले गेले असून नुकताच विद्यार्थ्यांच्या कलाकृती ला वाव मिळावा यासाठी मिडीया अकादमी ने फोटोग्राफी प्रदर्शन चे आयोजन केले होते.प्रदर्शनात चालता- बोलता , रस्त्यावर बाजुचे अनेक आकर्षक , भावविभाव दर्शवणारे छायाचित्रे जी पालिकेच्या शाळेतील मुलांनी टिपलेली छायाचित्रे लावण्यात आली होती. याशिवाय लोकांनी समुद्रात घाण टाकू नये, याविषयी जनजागृती करणाऱ्या छायाचित्रांचाही या प्रदर्शनात समावेश होता. या प्रदर्शनापूर्वी सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या मीडिया आकादमीतर्फे मुलांना फोटोग्राफीचे धडे देखील देण्यात आले होते.