संतापजनक : शेतकरी विष पित होता, सावकार शूटिंग करत होता

संतापजनक : शेतकरी विष पित होता, सावकार शूटिंग करत होता

 बीड: राज्यातील शेतकऱ्यांच्या संकटात दिवसेंदिवस भरच पडत आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बेलुरा इथं खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतक-यानं शेतातच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सगळ्यात संतापजनक म्हणजे हे सर्व संबंधित सावकारासमोरच घडत असताना सावकार मात्र या घटनेचं मोबाईल मध्ये शूटिंग करत होता.
संबंधित शेतक-यानं बहिणीच्या लग्नासाठी सावकाराकडे शेती गहाण ठेवली होती. शेतक-यान कर्जाची पूर्ण रक्कम परतफेड करूनही सावकारानं शेतीवरचा ताबा सोडला नाही. कर्जाची परतफेड करूनही शेती परत मिळत नसल्यानं त्रस्त शेतक-यानं आज अखेर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदाफ फपाळ असं शेतक-याचं नाव आहे. विष पिल्यानंतर शेतकरी एक तास शेतात विव्हळत होता. सावकाराचं नाव विलास फपाळ.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पीडित शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात शेतकऱ्यावर उपचार सुरू आहेत.