संभाजीनगरातला निजाम! सामनातून खा. इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका

संभाजीनगरातला निजाम! सामनातून खा. इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने इम्तियाज जलील यांच्यावर हे टीकेचे धनी झाले आहेत.

आपल्या खास शैलीत सामना वृत्तपत्रातून जलील यांचा समाचार घेतला आहे.

“मराठवाड्याने औरंगजेबाला गाडले, निजामाला गुडघे टेकायला लावले. इम्तियाज जलील यांनी निजामाची चाटुगिरी थांबवली नाही तर त्यांचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही.

मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्मारकासमोर संभाजीनगरची जनताच तुम्हाला गुडघे टेकायला लावेल असं अग्रलेखात म्हटलंय.

महाराष्ट्रभूमीत अशा जलीलगिरीस थारा मिळता कामा नये. स्वातंत्र्य सेनानींचा हा असा अपमान करणाऱ्या खासदारास कोणत्याही शासकीय सोहळ्यास बोलावू नये यासाठी शासनाने पुढे येऊन फतवा काढावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या लेखातून करण्यात आलंय.