Home News Update ८ जानेवारीला ग्रामीण भारत बंदची हाक

८ जानेवारीला ग्रामीण भारत बंदची हाक

Support MaxMaharashtra

राज्यात आणि देशभरात येत्या ८ जानेवारी रोजी देशातील २६५ संघटनांनी एकत्र येऊन ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यामातुन हे आंदोलन केलं जाणार आहे.  शेतीमालाच्या आयात- निर्यातीसंबंधी केंद्र सरकारच्या अयोग्य धोरणांमुळे देशातील शेतकरी बर्बाद होणार आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व पिडीत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केलं आहे.

सोबतच राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारने केलेली कर्जमाफी (Farmer’s Debt Forgiveness) ही जुजबी आहे. शेतकऱ्यांची चेष्टा करणारी आहे. म्हणुन या सरकारच्य़ा विरोधामध्ये आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी ८ जानेवारी रोजीचा बंद हा कडकडीत करण्याचं आवाहनही राजू शेट्टी यांनी केलं आहे. पाहा व्हिडीओ…

८ जानेवारीला ग्रामीण भारत बंदची हाक

८ जानेवारीला ग्रामीण भारत बंदची हाक राज्यात आणि देशभरात येत्या ८ जानेवारी रोजी देशातील २६५ संघटनांनी एकत्र येऊन ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यामातुन हे आंदोलन केलं जाणार आहे. शेतीमालाच्या आयात- निर्यातीसंबंधी केंद्र सरकारच्या अयोग्य धोरणांमुळे देशातील शेतकरी बर्बाद होणार आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व पिडीत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. #MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई शनिवार, 4 जनवरी 2020

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997