डॉलरच्या तुलनेत रुपया 8 महिन्याच्या निच्चांकी स्तरावर

डॉलरच्या तुलनेत रुपया 8 महिन्याच्या निच्चांकी स्तरावर

132
0

चीनच्या युआन या चलनामध्ये घसरण झाल्यानं अनेक देशांच्या चलनामध्ये उतार चढाव पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मंदीचं सावट आहे. दरम्यान रुपयाची किंमत आठ महिन्याच्या निच्चांकी स्तरावर गेली असून 14 डिसेंबर 2018 नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे.

त्यावेळेला डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 71.60 रुपये इतकी होती. ती आता 71.81 रुपये प्रति डॉलर वर पोहोचली आहे. सुत्रांच्या मते, भारतीय शेयर बाजारातून परकीय गुंतवणूकदारांनी तब्बल 902.99 कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्यामुळे शेअर मार्केटवर देखील सध्या उतार चढाव पाहायला मिळत आहेत.