दुष्काळग्रस्त ५० हजार मुलींना मोफत पास

दुष्काळग्रस्त ५० हजार मुलींना मोफत पास

कोल्हापूर : राज्य दुष्काळाने होरपळून निघाले आहे. अशातच महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले आहेत. राज्यातील दुष्काळग्रस्त १० तालुक्यांतील ५० हजार मुलींना नऊ महिन्यांचा पास, गणवेशासाठी कापड आणि बूट देणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळग्रस्त मुलींच्या शिक्षणासाठी, कपडे आणि बूट, चप्पल यांसाठी निधी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार २० लाख रुपये संकलित झाले आहेत. आणखी तीन दिवस पाटील यांचे स्वीय सहायक राहुल चिकोडे यांच्या जरगनगर येथील कार्यालयामध्ये निधी संकलन करण्यात येणार आहे.