Home News Update सुजय विखेंना 2000 रुपयांचा चेक पाठवणाऱ्या तरुणाला कोण करतंय ट्रोल?

सुजय विखेंना 2000 रुपयांचा चेक पाठवणाऱ्या तरुणाला कोण करतंय ट्रोल?

357
0

निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. त्यामुळे नेते आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा म्हणून मतदारांना विविध प्रलोभन देत असतात. मात्र, सरकारी पक्षाचे नेते मत नाही दिलं तर सरकारी योजनांमधील नागरिकांना दिलेले पैसे परत द्या असं कोणताही नेता आजवर बोलला नाही. मात्र, असं बोलण्याचं काम भाजपचे खासदार सुजय विखे यांनी केलं आणि त्यानंतर एका शेतकरी पुत्राने त्यांना 2000 रुपयांचा चेक पाठवला.

काय म्हटलंय होत सुजय विखे यांनी…

‘पालकमंत्र्यांनी विरोधी उमेदवाराच्या सभेला जाणाऱ्या लोकांची यादी काढावी. त्या सभेला जाणाऱ्या अनेकांच्या खात्यात मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको?, तुम्हाला कम‌ळ चालत नसेल तर ते पैसे परत करा, आम्हाला गरीबांच्या कल्याणासाठी तरी वापरता येतील,’

असं शेतकऱ्यांबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर दत्ता ढगे या शेतकऱ्याच्या मुलाने विखे यांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून विखे यांना 2 हजार रुपयांचा चेक स्पीड पोस्टाने पाठवला

होता. त्यानंतर विखे यांच्याकडून दत्ता ढगे यांची बदनामी केली जात असल्याचं त्याचं म्हणणं आहे… या संदर्भात त्यांनी विस्तृत भूमिका मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपासंदर्भात त्यांनी मॅक्समहाराष्ट्रला दिलेली मुलाखत

हे ही वाचा

विखे पाटीलांचं वक्तव्य ‘ते’ 2000 परत द्या, शेतकरी मुलाने पाठवला चेक

Support MaxMaharashtra

 

1) सुजय विखेंना चेक पाठविणारे कार्यकर्ते कोणाचे बघाच ….?
उत्तर – आम्ही छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आहोत. ज्या छात्रभारतीची ओळख स्वतंत्रपणे काम करणारी विज्ञान युगातील विद्यार्थ्यांची समतावादी संघटना अशी आहे. तुम्ही आम्हाला ज्यांचे कार्यकर्ते म्हणून समोर आणू इच्छिता. त्या थोरातांच्या घरावर ते स्वतः महसूल मंत्री असताना आम्ही मोर्चे घेऊन जात होतो. विरोधक म्हणवून घेणाऱ्या तुमच्या पैकी कुणी थेट एवढी विरोधात भूमिका घेली आहे का? त्यांच्या विरोधात आम्ही जेवढी आंदोलनं केली आहेत. त्याच्या निम्मी तरी तुम्ही केली आहेत का? कृपया व्यवस्थित माहिती घ्या. थोरातांच्या कार्यकर्त्यांना हे समजल्यावर ते सुद्धा हसत असतील तुमच्यावर.

2) वाळू तस्करी करून लुटलेले पैसे लाभार्थी नसताना चेक पाठविणारा हा कोण? असा प्रश्न तुमच्या बाबत बोलला जात आहे काय सांगाल?

वाळूतस्करी – स्वतःची एक दुचाकी सोडता माझ्याकडे दुसरे वाहन नाही. मला वाळू तस्कर म्हणने हा मला ओळखणाऱ्यांसाठी joke of the day आहे. गेली 10 वर्ष सार्वजनिक जीवनात अनेक प्रलोभनं समोर आली. संघटनेचं काम करत असताना संस्था चालकांनी अनेकदा आर्थिक व इतर प्रलोभनं देण्याचा प्रयत्न केला. परंतू ज्या छात्रभारतीचा वारसा आम्ही आत्मसात केला आहे. त्या संघटनेच्या मुशीत 10 वर्ष वाढलेला कुठलाच कार्यकर्ता असले दोन नंबर धंदे करणार नाही. खूप साऱ्या हितचिंतकांनी तुमच्यावर बदनामीच्या केस दाखल करण्याचा आग्रह केला. परंतू बदनामीकारक खोट्या पोस्ट शेअर करणारे तुम्ही देखील शेतकऱ्यांचीच मुलं आहात. आज तुम्ही बोलके पोपट आहात. पण येणाऱ्या काळात तुम्ही देखील सोबत असाल ही खात्री आहे.
चेक पाठवला त्याचे स्पष्टीकरण चेक पाठवतानाच दिले आहे. लोकशाहीत सर्वांच्या मताचे मूल्य समान असते. दोन हजारात आम्हा शेतकऱ्यांची मत विकत घेऊ पाहणाऱ्या सुजय विखे यांच्या मताची किंमत देखील दोन हजार इतकीच आहे. त्यामुळे विखेंनी शेतकऱ्यांच्या केलेल्या अपमानाची जाणीव त्यांना व्हावी. या हेतूने हा दोन हजार रुपयांचा चेक विखेंना पाठवून त्यांनी लोणीत कमळाला सोडून इतर कुणालाही मतदान करावे असे आवाहन आम्ही केले आहे.

मात्र, या सर्वामध्ये तुमचा गुन्हेगार म्हणून वारंवार उल्लेख होत आहे. या बद्दल काय सांगाल?

आदिवासी विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच मुलींच्या संरक्षणाची काळजी घ्यावी म्हणून राजूर प्रकल्प कार्यालयावर आंदोलन केले.
तंत्रशिक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अचानक बंद केल्यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागणार होते. त्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर केलेले आंदोलन आणि त्यासाठी भोगावा लागलेला आर्थर रोडचा 7 दिवसाचा तुरुंगवास.

हे गुन्हे असणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यापुढेही समाजासाठी जर काही करावे लागले तर त्याचा अभिमानच बाळगेन.

मात्र, तुमच्यावर तुम्ही सुजय विखे यांची जाणून बुजून बदनामी करत आहात असा आरोप होतो या संदर्भात काय सांगाल?
सुजय विखेंचा आणि आमचा बांधाला बांध नाही. व्यक्ती म्हणून विरोध असण्याचे काही कारण नाही. त्यांनी जर शेतकऱ्यांच्या मताची किंमत करून शेतकऱ्यांचा अपमान केला नसता तर त्यांना त्यांच्या मताच्या मूल्याची जाणीव करून द्यावी लागली नसती.

सुजय विखे-पाटलांच्या विरोधात व्हायरल होतयं ‘हे’ पत्र

पण तुमचे राजकीय नेत्यांबरोबर असलेले फोटोचं काय?
आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन नेहमीच प्रश्न सोडवू शकतील अशा सर्वपक्षीय नेत्यांना भेटत आलोत. निवडक फोटो टाकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये.
असली खोटी फालतू बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मुद्याचं बोला , विखेंनी शेतकऱ्यांचा केलेला अपमान योग्य आहे का? आम्ही नेहमीच चर्चेसाठी तयार आहोत, वार वेळ ठिकाण तुम्हीच ठरवा.

असं म्हणत दत्ता ढगे यांनी सुजय विखे यांना चर्चेचं खुलं आव्हान दिलं आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997