रामराजे म्हणतात, शरद पवारांना दुखवू शकत नाही पण…

रामराजे म्हणतात, शरद पवारांना दुखवू शकत नाही पण…

278
0

साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजेंनी आज दिल्लीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मात्र, आणखी एक राजे राष्ट्रवादी सोडणार का यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्याही पक्षबदलाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. रामराजेंनी आता येत्या आठ दिवसांत आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगितलंय.

रामराजेंनी गुरूवारी फलटणमध्ये जवळच्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली त्यात शिवसेनेत प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजत होतं. मात्र, शुक्रवारी फलटणमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी शरद पवारांना दुखावू शकत नाही असं विधान केलं.
मात्र, पुढच्या पिढीसाठी आणखी बरंच काम करायचंय. त्यामुळं त्यांच्यासाठी काय निर्णय घ्यायचा हे येत्या आठ दिवसांत जाहीर करू असं रामराजे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे.