राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवल्यानं राजनाथ सिंह ट्रोल!

राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवल्यानं राजनाथ सिंह ट्रोल!

बहुचर्चित राफेल फायटर विमान आज भारताला हस्तांतरित करण्यात आलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये मॅरेग्नेक एअरबेसवर हा हस्तांतरण सोहळा पार पडला. आज भारतीय वायू सेना दिवस आणि दसरा असल्यानं राफेल स्वीकारण्यासाठी आजचा दिवस निवडण्यात आला होता.

शस्त्रपूजन परंपरेप्रमाणे राफेल विमानाचंही पूजन करण्यात आलं. राजनाथ सिंह यांनी नारळ आणि फुलं ठेवून राफेलची विधिवत पूजा केली. राफेलवर कुंकवाने ओम असं लिहिण्यात आलं. त्यानंतर पहिल्या उड्डाणाआधी चाकांखाली दोन लिंबंही ठेवण्यात आली. मात्र आत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असलेल्या या विमानाची अशी पूजा केल्याने राजनाथ सिंह यांना ट्रोल करण्यात येतंय़.