Home News Update आणखी एक ठाकरे राजकारणात

आणखी एक ठाकरे राजकारणात

Support MaxMaharashtra

राज्याच्या राजकारणात ठाकरे घराण्यातील आणखी एका ठाकरेची एन्ट्री झालीये. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना आज मनसेच्या नेतेपदी नियुक्त करण्यात आले आहे. मनसेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात आज मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ही घोषणा केली. त्यानंतर अमित ठाकरे यांनी अधिवेशनात त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरूवातीलाच पहिला ठराव मांडला.

हे ही वाचा….

शिक्षणा संदर्भातला हा ठराव होता. पण यावेळी राज ठाकरे यांना व्यासपीठावर उपस्थित राहणं टाळलं. अमित ठाकरे हे सक्रीय राजकारणात कधी प्रवेश करणार अशी चर्चा काय असायची अखेर मनसेच्या भविष्यातील वाटचालीबाबत निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना राजकारणात सक्रीय केले आहे. आदित्य आणि अमित ठाकरेंच्या रुपानं ठाकरे घराण्याची तिसरी पिढी आता राजकारणात सक्रीय झाली आहे.

MNS Party new Flag
Courtesy: social media

कसं झालं अमित राज ठाकरे यांचं लॉंचिंग

कसं झालं अमित राज ठाकरे यांचं लॉंचिंग #MaxMaharashtra

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई गुरुवार, 23 जनवरी 2020

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997