…आणि राज ठाकरे हॉटेलात शिरले

…आणि राज ठाकरे हॉटेलात शिरले

राज ठाकरे हे अजब रसायन आहे. त्यांचे भाषण जेवढे जोरदार असते. तेवढंच ते आपल्या आवडीनिवडी विषयी सजग असतात. सिनेमा असो की, कला क्षेत्र किंवा क्रीडा राज ठाकरे दिवसातून एक-दोन फिल्म बघितल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत.

 सध्या निवडणुकांचा मोसम आहे .सभांसाठी धावपळ कार्यकर्त्यांना भेटने, यातून आपल्या आवडीनिवडी थोड्या बाजूला राहतात. पण यातही राज ठाकरे यांचं लक्ष आपल्या आवडी निवडीवर असतं.

कल्याण च्या सभेत सत्ताधारी पक्षाचा समाचार घेऊन राज ठाकरे मुंबईला येत होते. मध्येच ठाणे येते. आणि ठाण्यातली मामलेदार मिसळ ही राज ठाकरे यांच्या अत्यंत आवडीची.

राज ठाकरेंचा ताफा मामलेदार मिसळ हॉटेल कडे वळला आणि इथे एक वेगळी मैफल पाहायला मिळाली. अविनाश जाधव आणि ठाण्यातले दोन उमेदवार यांना ही राज ठाकरे यांनी मामलेदार मिसळ हॉटेलमध्ये बोलून घेतलं. एकीकडे निवडणुकांची चर्चा, प्रचाराचा आढावा आणि मिसळ अशी ही मैफल जमली अचानकपणे आलेल्या राज ठाकरे यांचा ताफ्या मुळे आजूबाजूचं वातावरण उत्साहाने भरून गेलं.

राज ठाकरे स्वतः हॉटेलमध्ये येऊन मिसळ खात आहे. याचा अप्रूप ठाणेकरांना झाला. मिसळ खाऊन झाली आणि गप्पाही झाल्या. राज ठाकरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात तोफ डागायला पुढे निघाले.