SONBHADRA : प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात

SONBHADRA : प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात

उत्तरप्रदेश पोलिसांनी आज काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतलं. त्यांना सोनभद्र ला जाण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

सोनभद्र ( Sonbharda ) येथील जमीन वादातून झालेल्या गोळीबारात दहा लोकांचा मृत्यू झाला होता तर 20 जण जखमी झाले होते. 1955 पासून सुरू असलेल्या जमीन वादात सोनभद्र येथील एका गावच्या सरपंचाने विवादीत जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांवर सरपंचाच्या गुंडांनी गोळीबार केला.
या हत्याकांडामुळे उत्तर प्रदेशचं राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी या हत्याकांडानंतर पिडीत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सोनभद्र इथं जायचा कार्यक्रम आखला होता. लखनऊ मध्ये बीएसयु रुग्णालयात जखमींची विचारपूस केल्यानंतर त्या सोनभद्रकडे रवाना झाल्या.


मात्र, मध्येच उत्तर प्रदेश पोलीसांनी त्यांचा ताफा अडवला. या कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी रस्त्यातच धरणे धरले.


प्रियांक गांधी यांच्या धरणे आंदोलनानंतर पोलिसांनी या भागात जमावबंदी लागू केली आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतलं. दरम्यान, पोलिसांनी आपल्याला या कारवाईविषयी काहीच माहिती दिली नाही, का अडवलं हे ही सांगीतलं नाही असा आरोप प्रियांका गांधी यांनी लावला आहे.

राहुल गांधी यांची सरकारवर टीका
प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीट करून उत्तर प्रदेश सरकार वर टीका केली आहे.