Home News Update पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी एका दिवसाचा खर्च १ कोटी ६२ लाख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी एका दिवसाचा खर्च १ कोटी ६२ लाख

Courtesy : Social Media
Support MaxMaharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी एका दिवसाचा खर्च १ कोटी ६७ लाख रुपये असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. डीएमके पक्षाचे नेते दयानिधी मारन यांनी याबाबत संसदेमध्ये प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना मोदींना एसपीजी सुरक्षा पुरवण्याचा एका दिवसाचा खर्च १ कोटी ६२ लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलंय.

सध्या देशामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपकडून (SPG) सुरक्षा पुरवण्यात येणाऱ्या व्यक्तींची माहिती द्यावी अशी मागणी मारन यांनी केली होती. मारन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी देशात केवळ एकाच व्यक्तीला एसपीजी सुरक्षा देण्यात येत असल्याचं सांगितलं. सीआरपीएफ देशातील ५६ अती महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवते इतकीच माहिती रेड्डींनी दिली.

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) च्या कायद्यामध्ये गेल्यावर्षी बदल करण्यात आला आहे. या बदलानंतर आता केवळ पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा पुरवली जाते. त्यामुळे ही व्यक्ती सहाजिकच पंतप्रधान आहेत हे उघड आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात एसपीजीसाठीचा निधी गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढवून ५९२ कोटी करण्यात आला आहे. म्हणजेच वर्षभराचा हिशोब केल्यास एका दिवसाचा खर्च १ कोटी ६२ लाख रुपये इतका आहे. एका तासाला हा खर्च ६ लाख ७५ हजार इतका होतो तर दर मिनिटाला मोदींच्या सुरक्षेसाठी ११ हजार २६३ रुपये खर्च होतात.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997