#MaxMaharashtra Impact : 20 बाळंतपणानंतर तिला मिळाली आरोग्य सुविधा

#MaxMaharashtra Impact : 20 बाळंतपणानंतर तिला मिळाली आरोग्य सुविधा

मॅक्समहाराष्ट्र ने 20 मुलांना जन्म दिलेल्या आणि आता 21 वं मूल तिच्या पोटात वाढतंय अशा लंकाभाऊ राजेभाऊ खरात या स्त्रीची एक विशेष बातमी केली होती ‘20 बाळंतपणानंतर ‘ती’ आता गरोदर आहे…’ या आशयाचं 6 September 2019 ला विशेष वृत्त प्रसारीत केलं होतं.

20 बाळंतपणानंतर ‘ती’ आता गरोदर आहे…

मॅक्समहाराष्ट्र च्या वृत्ताची दखल घेत माजलगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी यांनी आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी लंकाबाई यांच्या घरी धाव घेतली. आरोग्य अधिकाऱ्यांनी केसापुरी भागाच्या रहिवाशी पाल्यावर जाऊन त्यांची भेट घेत त्यांना आरोग्याच्या संबंधित जागृत करून त्यांना तात्काळ आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी तालुकाच्या ग्रामीण रुगणालायत भरती केले आहे. स्त्रीरोगतज्ञाकडून या महिलेची तपासणी करून घेतली असून तिला योग्य ती मदत तालुका आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे. असं डॉ अनिल परदेशी यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले.

दरम्यान पालावर राहणा-या अशा असंख्य लंकाबाई आहेत. बालमृत्यू, मातामृत्य तसंच बालविवाह यांचे प्रमाण कमी करायचे असेल तर सरकारच्या योजना अशा लंकाबाई पर्यंत पोहोचतात का ? याची दखलही शासन व प्रशासनांना घेणं गरजेचं आहे.