शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना ओपन मतदार संघातून निवडून आणलं – धनंजय मुंडे

शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना ओपन मतदार संघातून निवडून आणलं – धनंजय मुंडे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरु आहे. आज या दौऱ्यात नांदेड इथं बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचा चांगलाच समाचार घेतला.

शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र हा मंडल आयोग लागू करणार पहिलं राज्य होतं, हे सांगताना जे रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर त्यांच्यावर टीका करतात त्यांना ओपन मतदार संघातून निवडून आणण्याचं काम शरद पवारांनी केलं असल्याचं सांगत प्रकाश आंबेडकर यांच्यासह रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला.

LIVE : छत्रपतींच्या घरात फुट पाडायचं काम अण्णांजी पंतानी केलं – धनंजय मुंडे

LIVE : छत्रपतींच्या घरात फुट पाडायचं काम अण्णांजी पंतानी केलं – धनंजय मुंडे

Maxmaharashtra द्वारा इस दिन पोस्ट की गई बुधवार, 18 सितंबर 2019