वंचितची ताकद कोणासाठी धोकादायक?

वंचितची ताकद कोणासाठी धोकादायक?

653
0
मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने केलेली मतरुपी कामगिरी नाकारता येत नाही. बहुतेक मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या जागांवर मतसंख्या नोंदवून वंचितने महाराष्ट्रात एक मोठी शक्ती निर्माण केली आहे.  लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीवर भाजपाची बी टीम अशीही टीका झाली मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी भाजपलाच आपला प्रतिस्पर्धी घोषित केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून वंचितची ताकद काय असेल? हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
त्यातच एमआयएमनं साथ सोडल्यानं वंचितची आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काय रणनिती असेल? याचबरोबर वंचितने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान निर्माण केले आहे का? वंचित बहुजन आघाडीचा मुख्य शत्रू कोण? वंचित च्या राजकारणाचा फायदा भाजप शिवसेनेला होणार का?  या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचा विश्लेषणात्मक व्हिडीओ फक्त मॅक्स महाराष्ट्र वर…