Video : काय आहे प्रकाश आंबेडकरांची विधानसभेची रणनीति?

0Shares

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाला सोबत घेत वंचित बहुजन आघाडीची स्थापना करत लोकसभेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस – राष्ट्रवादी पक्षाबरोबर सेक्युलरवादी (धर्मनिरपेक्ष) पक्षांना याचा फटाका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकर सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे.