प्रकाश आंबेडकर का संतापले? पहा खळबळजनक मुलाखत

प्रकाश आंबेडकर का संतापले? पहा खळबळजनक मुलाखत

आता इथून पुढे कॉंग्रेस पक्षाशी संबध नाही,  चर्चा नाही आणि आघाडीही नाही अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. कॉग्रेसला फक्त घराणेशाही चालवायची आहे, कॉग्रेसनेते चर्चेचा देखावा करत असून आम्हाला सॅंडविच व्हायचे नाही असं त्यांनी मॅक्स महाराष्ट्रच्या ‘बिटविन द लाईन’ या खास कार्यक्रमात सांगितलं.
त्याच बरोबर इव्हीएम मशिन हॅक करणारा इंजिनियर कोर्टात सादर करून इव्हीएम चा पर्दाफाश आम्ही करणार असल्याची स्फोटक माहिती त्यांनी दिली. आमची लढाई ही भाजप बरोबर असून माध्यमांनी प्रकाश आंबेडकर यांना बदनाम करण्याची भूमिका बजावली आहे हे जर खोटे असेल तर माध्यमांनी माझ्यावर खटले भरावेत असं आव्हान आंबेडकर यांनी दिलं. वंचिताची सत्ता येणारच आणि आम्ही सामान्यांचं सरकार आणणांरच असा विश्वास त्यांनी व्यकत केला.
प्रकाश आंबेडकर यांची सर्वात खळबळजनक मुलाखत पहा मॅक्स महाराष्ट्रवर…