जेव्हा पाकिस्तानचे मंत्री करतात म्याऊ म्याऊ…

जेव्हा पाकिस्तानचे मंत्री करतात म्याऊ म्याऊ…

जगात ज्या वेगाने तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर होऊ लागला आहे कधी त्याचा फायदाही होतो तर कधी तोटा ही होतो. चांगल्या वाईट अनुभवांसोबत गंमतीशीर अनुभवही आपल्या समोर येत आहेत. सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानच्या मंत्र्यांची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानचे मंत्री शौकत युसूफैजई हे पत्रकार परिषद घेत असताना सुरु असलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये मांजरीचे कान असलेला फिलटर ऑन झाला आणि त्यांच्या डोक्यावर मांजरीचे कान दिसू लागले. या व्हिडीओचे सोशल मीडियावरील नेटीझन्सने स्क्रीन शॉट काढून मोठ्याप्रमाणात व्हायरल केले आणि त्यंाची खिल्लीही उडवली.

दरम्यान फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर हा व्हिडीओ ऑफिशियल साईट वरुन डिलीट करण्यात आला. मात्र सगळीकडे स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणतात व्हायरल झाला.

बरं पाकिस्तानच्या नेत्यांची खिल्ली उडवण्याचा हा पहिला प्रकार नाही अनेकदा सोशल मीडियावर आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये त्यांची अशाप्रकारे खिल्ली उडवण्यात आली आहे. या आधी पाकिस्तानच्या अवामी तेहरीक पक्षाचे जनरल सेक्रेटरी यांनी एक व्हिडीओ गेम मधला व्हिडीओ खऱ्या आयुष्याशी किती मिळतो असं सोशल मीडियावर लिहून पोस्ट केला होता. यावरुन त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली होती. पाहा हा व्हिडीओ

'Real-life footage'

Pakistani politician: 'Narrow escape of an aircraft which could have ended in a great disaster'#GTA5 STORY: https://on.rt.com/9xs9

RT द्वारा इस दिन पोस्ट की गई मंगलवार, 9 जुलाई 2019