Home News Update ‘पंतप्रधान कांद्याला घाबरतात’

‘पंतप्रधान कांद्याला घाबरतात’

‘मी कृषी मंत्री असताना देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.’ या बाबीचा उल्लेख करत शरद पवार यांनी ते कृषी मंत्री असताना कांद्याचे भाव वाढल्यानंतर भाजपचे नेते कसे आंदोलन करत यावरुन भाजपवर निशाणा साधला. शरद पवार सध्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज नांदेड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाजनादेश यात्रेनिमित्त महाराष्ट्रात येत आहेत. त्यांचं स्वागत करायलाच हवं. असं म्हणत पवार यांनी पंतप्रधान नाशिकमध्ये येत असताना शेतकऱ्यांना दोन दिवसांपासून कांदा विक्रीवर बंदी घातली असल्याचा दावा केला. पंतप्रधान कांद्याला घाबरतात. आणि इकडे पाकिस्तानचं हे करु ते करु सांगत असतात. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997