अधिकाऱ्यांना फोन केला तर ते म्हणतात अजून मंत्रीच जागेवर नाहीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बद्दल काय म्हणाल्या सुप्रिया सुळे.

झी मराठी वाहिनीवर ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम २९ जुलैपासून प्रसारित होणार आहे.
या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो दाखवण्यात आला.
त्यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुम्ही कमी बोलता आणि मी फक्त बोलतच राहते.
आता सगळीकडे खूप पाऊस वगैरे पडत आहे. तसेच ते चिन्हाचंही बघा आता काय होतंय. जरा उरकून टाका आणि कामाला लागूया. सव्वा महिना झाला माझा कामाचा सगळा खोळंबा झाला आहे. कलेक्टरला, अधिकाऱ्यांना फोन केला तर ते म्हणतात अजून मंत्रीच जागेवर नाहीत.”
“तेवढं फक्त काम करून घ्या. कारण माझी कामं खूप रखडली आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा