छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता...

शिवजयंतीनिमित्ती ‘रावरंभ’ चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती.
या चित्रपटात अभिनेता 'शंतनू मोघे' छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.
यापूर्वी त्यांनी 'स्वराज रक्षक संभाजी' या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.
हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार आहे.
'शशिकांत पवार' प्रॉडक्शन अंतर्गत 'रावरंभ' चित्रपटाचे दिग्दर्शन 'अनुप जगदाळे' यांनी केले आहे.