गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेला उत्तर प्रदेशातील सरयू नहार राष्ट्रीय प्रकल्प झाला पूर्ण

शेतकरी कल्याण आणि सक्षमीकरणासाठी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित प्रकल्प अखेर पूर्ण
घाघरा, सरयू, राप्ती, बाणगंगा आणि रोहिणी या पाच नद्यांना जोडण्याचं काम या प्रकल्पामार्फत होणार
सरयू नहार राष्ट्रीय प्रकल्पामुळं 6200 हुन जास्त गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे
पूर्व उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे
या प्रकल्पावर मागील चार वर्षांत 4600 कोटी रुपयांहून अधिकचा खर्च झाला आहे