आज राज्यात सर्वत्र दहीहंडी निमित्त जल्लोषाच वातावरण आहे.
रायगडमध्ये संशयास्पद बोट आढळली त्यामुळे मुंबईसह दक्षतेसाठी राज्यभरात अलर्ट देण्यात आल आहे.
हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या.
त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे.
"ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची असून बोटीचे इंजिन बिघडल्याने ती रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर तरंगत आली" गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहीती दिली.
या घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवादविरोधी पथक करीत असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.