आरे जंगलप्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ; एकही झाड न कापण्याचे आदेश.

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वृक्षतोडीविरोधात निर्देश दिले आहेत
आरेतील एकही झाड कापू नये असे निर्देश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारला दिले
आरेतील झाडे कापण्यास सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना, झाडे कापत असल्याचा आरोप करून पर्यावरणप्रेमीनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली.
न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत एकही झाड कापू नये असे आदेश दिले.
पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.