महिला विवाहित असो वा अविवाहित प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार
अविवाहित महिलांना गर्भपाताच्या अधिकारापासून दूर ठेवणे असंविधानिक
सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा सर्व महिलांना अधिकार- सर्वोच्च न्यायालय
2021 च्या गर्भपात कायद्यात विवाहित आणि अविवाहित असा फरक केला नाही, सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी
गर्भपाताच्या कायद्यातील कलम 3 बी हे फक्त विवाहित महिलांसाठी असेल, तर फक्त विवाहित महिलांना लैंगिक संबंधाचा अधिकार असल्याचा पुर्वग्रह होईल. त्यामुळे हे मत संविधानिक कसोटीवर टिकणार नाही- सर्वोच्च न्यायालय
महिलांना गर्भपातासंबंधी निर्णय घेण्याचे पुर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे- सर्वोच्च न्यायालय
मुलांना जन्म देण्याचा अधिकार विवाहित महिलांसह अविवाहित महिलांनाही आहे, सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले मत
एमटीपी कायदा 20-24 आठवड्यांचा गर्भ असलेल्या महिलांना गर्भपाताचा अधिकार देतो. त्यामुळे हा अधिकार फक्त विवाहित महिलांना दिला आणि अविवाहित महिलांना दिला नाही, तर कलम 14 चा भंग ठरेल.
सर्वोच्च न्यायालयाने विवाहित महिलांसह अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार असल्याचा दिला ऐतिहासिक निर्णय