मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी मेगा ब्लॉक

CST आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक
CST आणि विद्याविहार स्थानकांदरम्यानची सेवा डाउन जलद मार्गावर वळविली जाऊन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील
घाटकोपर येथून सकाळी 10.40 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणारी अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि CST दरम्यान अप जलद मार्गावर वळविली जाणार
पुढे कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील
ब्लॉक कालावधी दरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी