राष्ट्रपती भवनातील मुघल उद्यानाला आता ‘अमृत उद्यान’ असे नाव देण्यात आले

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
138 प्रकारचे गुलाब, 10,000 पेक्षा जास्त ट्यूलिप बल्ब आणि 70 विविध प्रजातींच्या सुमारे 5,000 हंगामी फुलांच्या प्रजाती आहेत.
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले होते.
31 जानेवारीपासून राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार असुन हा उद्यान उत्सव 26 मार्च 2023 पर्यंत सुरु राहील.