नाशिक जिल्ह्यातील 11 वर्षीय मुलीचा वेठबिगारीतून मृत्यू झाल्याची घटना मन विषण्ण करणारी
अहमदनगर, नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत.
पैशांसाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे.
कायद्याने वेठबिगारीचे उच्चाटन झाले असले तरी अजूनही ही प्रथा अस्तित्वात
यामुळे प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना आढळणे राज्याला शोभा देणारं नाही
राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश द्यावेत
वेठबिगारांचा शोध घेऊन त्यांची सूटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपुर्ण प्रशासनाने सहानुभूतीपुर्वक लक्ष द्यायला हवे
वेठबिगारी ही क्रुर प्रथा आहे. तिच्या निर्मुलनासाठी समाजात सतर्कता हवी.
वेठबिगारीचा प्रकार कुठे आढळला तर तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार करा किंवा जवळच्या मनसेच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांना सूचित करा
मनसे कार्यकर्ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई करतील आणि गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील, असा थेट इशाराच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.
ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.