भारत जोडो यात्रेत कोल्हापुरातील लाल मातीतील पैलवान अंगाला तेल लावून उभे होते. या पैलवानांनी खुस्ती देखील खेळली, राहुल गांधींनी कुस्ती पाहाण्याचा आनंद घेतला.
राहुल गांधी यांच्यासमोर हलगी वाजवून कला सादर केली.
“भारत जोडो यात्रा” चे टी-शर्ट परिधान करुन आकर्षाणाचा केंद्रबिंदू ठरला.
भारत जोडो यात्रेत लहान मुलीने राहुल गांधी यांचा फोटो हातात घेऊन अभिवादन केले.
राहुल गांधी ज्या रस्त्यावरुन चालत जाणार आहेत, त्या रस्त्याच्या शेजारी रांगोळी काढून राहुल गांधी यांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
भारत जोडो यात्रेत पारंपारिक वेशभूषा करुन राहुल गांधी यांना पाठिंबा दिला.
भारत जोडो यात्रेत महिलांनी देेखील लाठीकाठी फिरवून मर्दानी ताकद दाखवली.
वारकरी संप्रदायी परंपरा वैचारिक असल्याने त्यांच्या विचारांचा प्रभाव भारत जोडो यात्रेत पडावा, यासाठी वारकरी संप्रदायातील लोक सहभागी झाली.
भारत जोडो यात्रेत महिलांनी तिरंगा हातात घेऊन आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत असा संदेश देण्याचे काम महिलांनी केले