'या' जिल्ह्यांमध्ये आजपासून 8 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणारा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मुसळधारांची शक्यता आहे. 
पुणे, नाशिक, कोल्हापूर, साताऱ्यासह पश्चिम-मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागांत काही ठिकाणी आजपासून 8 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता.
रायगड आणि पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी 7 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशाराही आहे.
रविवारसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे.