मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी ; उपमुख्यमंत्री म्हणाले..
मुंबई पोलिस ट्राफिक कंट्रोल रुमला धमकीचे मेसेज आल्यामुळे खळबळ माजली होती.
मुंबई पोलिसांनी या धमकीची दखल घेत अलर्ट जारी केली आहे.
२६/११ सारखा भयानक हल्ला पुन्हा एकदा करणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली
कंट्रोल रुमच्या नंबरवर पाकिस्तानमधून हे धमकीचे मेसेजेस आले होते
"हे प्रकरण खूप गंभीर असून मुंबईत पुन्हा २६/११ घडवण्याची धमकी देण्याऱ्या नंबरचा तपास सध्या सुरू आहे. हे मेसेज कुणी आणि कसे पाठवले याची चौकशी सुरू आहे. यानंतर सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून मुंबईचे पोलिस आयुक्त अधिकची माहिती देणार आहेत." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत