MPSC उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली; परीक्षांच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार, निकाल मार्च महिन्यापर्यंत जाहीर होणार
मुख्य परीक्षा 7,8 आणि 9 मे रोजी होणार, या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर होणार
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्गासाठी पूर्व परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार
निकालाची तारीख परीक्षांच्या आधीच जाहीर झाल्याने उमेदवारांना मोठा दिलासा, निर्णयाचं परीक्षार्थींनी केलं स्वागत