पुरुष आणि महिलांनी 'या' वेळेत व्यायाम केल्यास होईल जबरदस्त फायदा
व्यायामाची वेळ
असे म्हणतात की, सकाळी व्यायाम करणे सर्वात फायदेशीर आहे.
pixel
तुमच्या सेक्सवर अवलंबून
एका अभ्यासातून समोर आले आहे की, व्यायामाची परिणामकारकता ही तुमच्या सेक्सवर देखील अवलंबून असते.
काय सांगतो अभ्यास
मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आलेय की, सकाळी व्यायाम करणे हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते.
पुरुषांना काय फायदा?
तर, पुरुषांनी संध्याकाळच्या वेळेस व्यायाम केला तर ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
काय आहे फायदा?
खरं तर कुठल्याही वेळेस व्यायाम केल्यावर महिलांच्या शरीरातील चरबी, पोटाची चरबी कमी झाली. पण सकाळी व्यायाम केल्याने त्याचा जास्त परिणाम दिसून आला.
पुरुषांवर काय परिणाम?
अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे पुरुष फक्त संध्याकाळी व्यायाम करतात त्यांनी एचडीएल कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि कार्बोहायड्रेट ऑक्सिडेशन कमी केले.
संध्याकाळच्या व्यायामामुळे पुरुषांमधील बीपी, ह्रदयविकाराचा धोका, थकवा कमी झाल्याचं दिसून आलं आहे. तर सकाळच्या व्यायामामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.
संशोधन कसे झाले?
अभ्यासासाठी, टीममध्ये ३० महिला आणि २६ पुरुषांचा समावेश होता. हे सर्वजण २५ ते ५५ या वयोगटातील होते आणि सर्वच निरोगी, जास्त अॅक्टिव्ह, धूम्रपान न करणारे आणि सामान्य वजनाचे होते.
अभ्यास कसा करण्यात आला?
हा अभ्यास करताना वेगवेगळ्या वेळी १२ आठवड्यांहून अधिक काळ प्रशिक्षण देण्यात आले.