‘राणादा’ व ‘पाठक बाई’ लग्न बंधनात ?
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.
ते दोघेही सोशल मिडीयावर सक्रीय असतात.
हार्दिक व अक्षया यांच्या घरात लगीनघाई सुरू झाली आहे.
नुकतेच हार्दिक व अक्षयाचे पहिले केळवण पार पडले आहे.
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे रोजी हार्दिक व अक्षयाचा साखरपुडा पार पडला होता.
अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.