भाजपाचा शिवसेना संपण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे यांची “दोन ते तीन पातळ्यांवर लढाई

“नागाला कितीही दूध पाजलं, तरी चावायचं तो चावतोच,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी लक्ष्य केलं.
शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा पुनरुच्चार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
जे पी नड्डा यांनी शिवसेना संपण्याच्या मार्गावर असल्याचं विधान केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांनाही लक्ष्य केलं.
अनेक आव्हानं पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवला आहे असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“दोन ते तीन पातळ्यांवर आपली लढाई सुरु आहे. रस्त्यावरील लढाईत आपण काही कमी पडणार नाही.
कोर्टातही सुनावणी सुरु आहे.
तिसऱी लढाई म्हणजे शपथपत्र आणि सदस्य नोंदणी आहे. विषय गंभीर असून अर्ध्यात सोडू नका,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं.