Home > पर्सनॅलिटी > मॅक्स पर्सनॅलिटी - प्रकाश खांडगे

मॅक्स पर्सनॅलिटी - प्रकाश खांडगे

मॅक्स पर्सनॅलिटी - प्रकाश खांडगे
X

लोककलांना सैध्दांतिक बैठक प्राप्त करून देण्याचे वोगळे कार्य मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे यांनी केले आहे. लोककलावतांच्या कल्याणासाठी झटणारा त्यांचा मार्गदर्शक, लोकलांचा अभ्यासक, विविध लोककला महोत्सवांचा यशस्वी संयोजक अशा वेगवेगळ्या भूमिकेत डॉ. खांडगे यांनी महाराष्ट्राच्या लोककलांना अपूर्व योगदान दिले. ते २८ फेब्रुवारी २०१७ रोजी लोकला अकादमीतून निवृत्त झाले.

२००४ साली मुंबई विद्यापीठात लोककला अकादमी सुरू झाली. तत्कालीन कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून सुरु झालेल्या लोककला अकादमीची धुरा प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्याकडे सोपवण्यात आली आणि एका तपाच्या कालखंडात लोककला अकादमीने चांगलेच बाळसे धरले.

डॉ. खांडगे हे मुळचे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील पिंपळगावचे. घरची वारकरी परंपरा, वडील ह.भ.प सहादेव खांडगे किर्तनकार होत. त्यामुळे बालपणापासून त्यांना संत आणि लोकसाहित्याच्या अभ्यासाची गोडी लागली. १९८० साली त्यांनी इंडियन नॅशनल थिएटर लोकनाट्य कला संशोधन केंद्रात काम सुरु केले. जेष्ठ नाटककार, गीतकार अशोकजी परांजपे यांना गुरुस्थांनी मानून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला व लोककलांचा अभ्यास सुरु केला. १९७९ साली आय.एन.टी ची ‘खंडोबाचं लगीन’ हे नाटक रंगभूमीवर आणलं जे डॉ. खांडगेंच्या संशोधनावर आधारित होते.

चाळ माझ्या पायात, खंडोबाचे जागरण, भंडारबुका, नोहे एकल्याचा खेळ असे ग्रंथ डॉ.खांडगे यांनी लिहिले. डॉ.खांडगे यांनी अनेक लोककलावंतांना न्याय मिळवून दिले. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांना कर्ज मुक्त करण्याची मोहिम सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. लोककला आर्थिक अनुदान पॅकेज, तमाशा, लावणी महोत्सव, लावणी शिबिरे अशा शासनाच्या अनेक पथदर्शी योजनांच्या अंमलबजावणीत डॉ.खांडगे यांचा सल्ला मोलाचा ठरला. गावाच्या वेशीबाहेरची लावणी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मुख्य कार्य डॉ. खांडगे यांनी केले. त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पत्नी शैलजा खांडगे यांनी लोकरंग सांस्कृतिक मंच संस्थेच्या माध्यामातून अनेक लावणी महोत्सव, लोककला महोत्सव, लोककला संमेलन आयोजित केली.

data-href="https://www.facebook.com/MaxMaharashtra/"

data-width="380"

data-hide-cover="false"

data-show-facepile="false"

data-show-posts="false">

मुंबई दूरदर्शच्या प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमातून त्यांनी महाराष्ट्रातील मान्यवर लोककलावंतांच्या मुलाखती घेतल्या. दैनिक लोकमत मध्ये काम करत असतांना त्याचं ‘चाळ माझ्या पायात’ हे लावणी कलावतींचे सदर खूपच गाजले.

डॉ. खांडगे यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागात अनेक महत्वाच्या समित्यांवर काम केले. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र अकादमीच्या लोककला शाखेचे ते तब्बल १० वर्ष अध्यक्ष होते. भारत सरकारच्या संगीत अकादमीच्या महापरिषदेवर त्यांनी पाच वर्ष सदस्यत्व भूषविले. मराठी विश्वकोश, विश्व चरित्रकोश, साहित्य संस्कृती मंडळ, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या विविध प्रकाशने व ग्रंथामध्ये त्यांनी मोलाचे लेखन केले आहे. त्यांना आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. २००९ मध्ये सासंस्कृतिक क्षेत्रातील मोठ्या योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कलादान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आरती सायगांवकर-करंजकर

शाहीर अमरशेख अध्यासन

मुंबई विद्यापीठ

Updated : 9 March 2017 6:40 PM GMT
Next Story
Share it
Top