Home News Update VIDEO : कलम 370 हटवणं योग्य की अयोग्य, काय आहे जनतेचं...

VIDEO : कलम 370 हटवणं योग्य की अयोग्य, काय आहे जनतेचं मत…

गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत काश्मीरच्या विभाजनासंदर्भात विधेयक मांडत जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणार 370 कलमामधील काही कलम हटवण्यात येत असल्यासंदर्भात विधेयक मांडलं. हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकांच्या बाजूने 125 तर विरोधात 61 मतं पडली.
जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यासंदर्भात आम्ही जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या

अमित शहा यांच्या ३७० कलम रद्द करण्याच्या विचाराशी काही लोक सहमत नाहीत, काही लोकांच मत आहे की, सरकारने अशा गोष्टींमध्ये लक्ष देण्यापेक्षा गरजुंना मदत करावी. तर काही सहमत आहेत. तर काही लोकांनी हा कायदा रद्द केल्यानंतर सर्वाधिक फायदा काश्मिरच्या जनतेला होणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर काही लोकांच्या मते हे कलम रद्द केल्याने काश्मिरमध्ये अचानक होणारी दगडफेक तसेच, स्त्रियांवर होणारे अत्याचार यावर आळा बसेल व गुन्हेगारी वर नियंत्रण ठेवता येईल. तर काही लोकांनी हे कलम रद्द झाल्याने खऱ्या अर्थाने भारतात सामील झाल्याचं मत व्यक्त केलं आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997