Home Election 2019 ‘मला आमदार का व्हायचंय’ ‘विकासाचा उपभोग घेणाऱ्यांनी त्याची किंमत चुकवायची तयारी ठेवायला हवी’

‘विकासाचा उपभोग घेणाऱ्यांनी त्याची किंमत चुकवायची तयारी ठेवायला हवी’

39
0

मोठ्या शहरांमध्ये विकास होतो. मात्र तिथल्या गरज पूर्ण करताना ग्रामीण भागावर मोठा ताण येतो. विकासाचा उपभोग घेणाऱ्यांनी त्याची किंमत चुकवायची तयारी ठेवायला हवी असं मत श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केलं.

‘मॅक्स महाराष्ट्र’च्या ‘कसं काय महाराष्ट्र?’ या निवडणूक विशेष दौऱ्यात त्यांनी मनमोकळा संवाद साधला. पारोमिता गोस्वामी या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना भेटण्यासाठी आम्ही या मतदारसंघात आलो.

पश्चिम बंगाल ते चंद्रपूर व्हाया मुंबई-ठाणे असा त्यांचा प्रवास त्यांनी या मुलाखतीत सांगितला. चंद्रपूर जिल्ह्यातील वीज निर्मिती केंद्रामुळे मुंबईत २४ तास वीज मिळते मात्र चंद्रपुरातच ४ तासांचं लोडशेडिंग आहे. ही कोणती समानता आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. समाजकारणातून राजकारणात आल्याचं अनेक मान्यवरांनी स्वागत केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. पाहा संपूर्ण मुलाखत…

Support MaxMaharashtra


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997