५ भारतीय जवानांना ठार केल्याचा पाकचा दावा

५ भारतीय जवानांना ठार केल्याचा पाकचा दावा

सौ. इंटरनेट
जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारताच्या ५ सैनिकांना ठार केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केलाय. या गोळीबारात आपल्या ३ सैनिकांना हुतात्म्य आलं तर भारताचे ५ सैनिक ठार झाल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एका ट्वीटमध्ये केला.
पाकिस्तानकडून हे ट्वीट आल्यानंतर भारतीय लष्कराकडून याचं खंडण करण्यात आलंय. पाकिस्तानचा हा दावा काल्पनिक असल्याचं भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय. भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर गोळीबार वाढवला असल्याचा आरोप गफूर यांनी गुरुवारी केला होता. १५ ऑगस्टच्या दिवशी सुद्धा पाकिस्तानने एलओसीर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. मात्र लगेचच हा दावा खोटं असल्याचं भारतीय लष्कराने गुरुवारी स्पष्ट केलं.