INX Media Case : चिदंबरम यांच्या अटकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी,

INX Media Case : चिदंबरम यांच्या अटकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी,

Mumbai: Congress party leader P Chidambaram during an event at Indian Merchants' Chamber in Mumbai on Saturday. PTI Photo by Mitesh Bhuvad(PTI3_11_2017_000183A)
माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना INX Media प्रकरणात अटक केल्यानंतर राउज एवेन्यू येथील सीबीआय च्या विशेष न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यातील एक याचिका सीबीआय विरोधात तर दुसरी ईडी विरोधात आहे. थोड्याच वेळात या याचिकेवर सुनावणीला सुरुवात होणार आहे.

महत्त्वाच्या बाबी…

चिदंबरम पाच दिवसाची सीबीआय कोठडी
नातेवाईकांना आणि वकिलांना भेटण्यासाठी 30 मिनिटांचा अवधी
चिदंबरम यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
सीबीआयच्या कोठडीत पी चिदंबरम यांनी काढल्या दोन रात्री