वेडात फक्त सात नाही आता एकसाथ दौडू-उद्धव ठाकरे 

वेडात फक्त सात नाही आता एकसाथ दौडू-उद्धव ठाकरे 

ज्या कारणांमुळे वाद होता ते संपवले मग आता वाद कसला?  वेडात फक्त सात नाही आता एकसाथ दौडू, अशी एकीची ललकारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. शिवसेनेचा  ५३ व्या वर्धापन दिन सोहळा षण्मुखानंद सभागृहात बुधवारी पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडीला मांडी व्यासपीठावर एकत्र बसले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कायम माझ्या स्मरणात आहेत.  शिवसेना-भाजपा युतीमधला संघर्ष संपला आहे, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले. मैदान साफ असताना पायात पाय अडकून पडण्याचा धोका असतो.युती करताना पूर्ण विचारुन केली. पुन्हा वाद होणार नाहीत याची काळजी घेतली आहे.  दुसऱ्याच्या पराभवावर मी आनंद व्यक्त करत नाही.  कर्माने मरणार त्याला धर्माने मारू नकोस हे मला शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितले, अशी आठवणही उद्धव यांनी सांगितली.
भाषणातील आणखी मुद्दे
  • मोदींच्या पंतप्रधान होण्यामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा.
  •  सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्यांना पराभव झाला त्याचा आनंद आहे.
  • काश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे.
  •  कलम ३७० काढणार नाही म्हणाऱ्यांचा पराभव झाला त्याचा आनंद