Home News Update हिंदू कादंबरीचा दुसरा भाग 6 महिन्यात वाचकांना मिळेल – भालचंद्र नेमाडे

हिंदू कादंबरीचा दुसरा भाग 6 महिन्यात वाचकांना मिळेल – भालचंद्र नेमाडे

मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, अध्यापक भालचंद्र नेमाडे सध्या ‘हिंदू’ कांदबरीचा दुसरा भाग लिहित आहेत. त्यांना ‘हिंदू’ या कांदबरीच्या पहिल्या भागासाठी साहित्य विश्वातील सर्वोच्च समजला जाणारा 50 वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. ते सध्या महाराष्ट्रातील जळगाव इथं हिंदू कांदबरीचा दुसरा भाग लिहित आहेत. ‘हिंदू’ कांदबरी आल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
भालचंद्र नेमाडे यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी जळगाव जिल्ह्यातील सांगवी येथे झाला आहे. त्यांनी पहिली कांदबरी सीमला येथे लिहिली आहे. आता दुसरी कांदबरी त्यांचे जन्मगाव सांगवी येथे झाला. १९५५ मध्ये जळगाव जिल्ह्यातील भालोदच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून प्रथम श्रेणीत शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून भाषा विज्ञान या विषयात एम्.ए. पूर्ण केले. त्यानंतर १९६४ मध्ये मुंबई विद्यापीठातून एम्.ए. (इंग्रजी) चे शिक्षण पूर्ण केलं. पुढे १९८१ मध्ये औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी आपलं पीएच्.डीचं शिक्षण. पूर्ण केले.
अध्यापक ते लेखक प्रवास…
अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, गोवा, लंडन, मुंबई अशा विविध ठिकाणी १९६४ ते १९९८ पर्यंत नेमाडे यांनी अध्यापक म्हणून काम केले. १९९१ ते १९९८ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलनिक साहित्य अध्यासनमध्ये अध्यापन केले. इंग्रजी भाषा आणि साहित्य, वाङ्मयप्रकार, भाषाविज्ञान, भारतीय साहित्य, तौलनिक साहित्य, मराठी भाषा आणि साहित्य इत्यादीमध्ये त्यांचे अध्यापनाचे आणि संशोधनाचे विषय राहिले आहेत.
राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील साहित्यिक आणि सांस्कृतिक मंडळावर सल्लागार सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांची इंग्रजी आणि मराठी ग्रंथसंपदा विपुल आहे. नेमाडे यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात फेब्रुवारी १९५६ पासून झाली.
‘निळे मनोरे’ ही त्यांची पहिली कविता, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रथम प्रकाशित झाली. त्यांनतर विविध नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. १९७० मध्ये मेलडी हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर १९९१ मध्ये देखणी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. पण त्यांना ओळख मिळाली ती १९६३ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘कोसला’ या कादंबरीमुळे आणि नंतरच्या त्यांच्या समीक्षालेखनामुळे.
नेमाडे यांची साहित्यसंपदा –
मेलडी (१९७०), देखणी (१९९१) हे कवितासंग्रह; कोसला (१९६३), बिढार (१९७५), झूल (१९७९) हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ (२०१०) ह्या कादंबऱ्या ; साहित्याची भाषा (१९८७), टीकास्वयंवर (१९९०), तुकाराम (१९९४), साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण (२००१) दि इनफ्लुअन्स ऑफ इंग्लीश ऑन मराठी (१९९०), अ सोशिओलिंग्विस्टिक ॲन्ड स्टायलिस्टिक स्टडी, नेटिविझम मराठी-इंग्रजी समीक्षात्मक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या साहित्याचे इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मलयाळम्, गुजराती, पंजाबी, उर्दू, उडियामध्ये अनुवाद झाले असून विशेष म्हणजे त्यांच्या झूल आणि हिंदू कादंबरीचे ब्रेल या अंधांसाठीच्या लिपीतही रूपांतर झाले आहे.
नेमाडे यांना मिळालेले पुरस्कार…
ह. ना. आपटे पुरस्कार (१९७६ बिढारसाठी), कुरुंदकर पुरस्कार (१९८७), साहित्य अकादमी पुरस्कार (१९९१), कुसुमाग्रज पुरस्कार (१९९१), बहिणाबाई पुरस्कार (१९९१), महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (२००१), लाभसेटवार फाउंडेशन पुरस्कार (२००३), पद्मश्री (२०११), जनस्थान पुरस्कार (२०१३), साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार (२०१४) इ. अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
Support MaxMaharashtra

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997